Sunday, June 20, 2010

मच्छिंद्र कांबळी यांचे मालवणी कोंकणीच्या प्रचार आणि प्रसारातील योगदान

मच्छिंद्र कांबळी यांचे मालवणी कोंकणीच्या प्रचार आणि प्रसारातील योगदान

मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी आणि कोंकणी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी कोंकणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसा खऱ्या अर्थाने उमटला तो, "वस्त्रहरण'मधील तात्या सरपंच या भूमिकेने. "वस्त्रहरण' या नाटकाचे 5000 प्रयोग झाले.


त्यानंतर पांडगो इलो रे इलो , घास रे रामा , वय वर्ष पंचावन्न , भैय्या हातपाय पसरी , येवा कोकण आपलाच असा , माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.


मच्छिंद्र कांबळींच नाटक वस्त्रहरण मी पहिल्यांदा तळवडेत पाहिले आणि मी बाबुजींचा फॅन झालो. जिवंत अभिनय आणि योग्य टायमिंग हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे. मच्छिंद्र कांबळी खासदार पदासाठी निवडणुकीला उभे होते त्यावेळी प्रचारासाठी त्यांनी तळवडेला धावती भेट दिली होती आणि खास मालवणीतुन भाषण केले होते. ते भाषणही माझ्या स्मरणात आहे.


मालवणी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध नाट्यनिर्माते, मालवणी भाषा सातासमुद्रापार पोचविणारे मच्छिंद्र कांबळी वय ५८ यांचे दि. ३०/०९/२००७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले.

No comments:

Post a Comment

We are registered with

Blog Directory
Related Posts with Thumbnails